विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर झाडे कोसळल्याने वाहतुकीस अडथळे

⚡मालवण ता.१३-: कुंभारमाठ ते चिपी विमानतळ या रस्त्यावर वरची देवली शेवरेवाडी येथे रस्त्यात मोठी झाडे कोसळली असून यामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण झाले आहेत. झाडे कोसळल्यामुळे या रस्त्यावरून केवळ दुचाकी वाहने,चार चाकी लहान वाहन, रिक्षा जाऊ शकत आहे. अवजड वाहने किंवा मोठ्या कार नेणे धोक्याचे बनले आहे.

तसेच झाडे कोसळल्यामुळे रस्त्याच्या बाजूला पोल आणि विजेच्या तारा तुटून पडलेल्या आहेत. त्यामुळे वाहनचालक व पादचारी यांना सावधगिरी बाळगावी लागत आहे. गेल्या वर्षी रस्ता कोसळला ते दुरुस्त करायला जिल्हा प्रशासनास वेळ मिळाला नाहीय, त्यामुळे आता झाडे कोसळून निर्माण झालेल्या समस्येकडे प्रशासन कधी लक्ष देणार असा प्रश्न स्थानिक ग्रामस्थ व वाहनचालकांकडून उपस्थित होत आहे. ही झाडे तात्काळ हटविण्यात यावेत तसेच वीज पोल व वीज तारा पूर्ववत करण्यात याव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

You cannot copy content of this page