राष्ट्रीय,राज्यपुरस्कार प्राप्त शिक्षकसंघाने वेधले शिक्षण मंत्र्यांचे लक्ष

⚡मालवण ता.१३-: राष्ट्रीय- राज्यपुरस्कार प्राप्त शिक्षकसंघ आणि सिंधुदुर्ग जिल्हा पुरस्कार प्राप्त लढा मंच तर्फे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन निवेदन देऊन विविध प्रलंबित प्रश्नांविषयी लक्ष वेधले. तसेच जिल्हापुरस्कार वेतनवाढ प्रश्नाविषयी चर्चा केली. शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन यावेळी ना. केसरकर यांनी दिले.

या भेटीचे नियोजन महेश पालव, विठ्ठल कदम व भरत गावडे यांनी केले होते. यावेळी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे पुष्पगुच्छ देऊन जिल्हाध्यक्ष शिवराज सावंत यांनी स्वागत केले. या भेटीवेळी राज्यमुख्यसंघटक पांडुरंग काकतकर, जिल्हा मुख्यसंघटक विठ्ठल कदम, जिल्हा कोषाध्यक्ष उदय गोसावी, बाबाजी झेंडे, दत्तगुरु कांबळी, महेश पालव, प्रमोद पावसकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page