भुरट्या चोरट्यांपासून जनतेने राहावे सावध…

पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांचे आवाहन…

⚡सावंतवाडी ता.१३- : पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी भुरट्या चोरांपासून सावध राहण्यासाठी जनतेस आवाहन केले आहे‌. अलीकडील काळात मागील दहा दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्हा व नजीकच्या रत्नागिरी जिल्ह्यात मोटार सायकलवर बसलेले दोन इसम वयोवृध्द नागरिकांना हेरून पुढे चोरी झाल्याचे सांगून अंगावरचे दागिने सुरक्षित ठेवण्याचे आमिष दाखवून त्यांचे दागिने पळवून नेण्याच्या घटनेत वाढ झालेली आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या कोणत्याही आमिषाला बळी पडू नये.

तसेच अशा प्रकारे कोणीही आमिष दाखवीत असल्यास तात्काळ सावंतवाडी पोलीस ठाण्यास कळवावे असं आवाहन
पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे 02363272066 यांनी केल आहे.

You cannot copy content of this page