⚡देवगड ता.११-: महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अंतर्गत जामसंडे कार्यक्षेत्रातील अंगणवाड्या मिळून एकत्र राष्ट्रीय पोषण महा कार्यक्रम अंगणवाडी केंद्र जामसंडे टापू येथे साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला नगरसेविका मनीषा जामसंडेकर, उपकेंद्र जामसंडे च्या डॉ.अर्चना मर्गज, आरोग्य सेविका सुनंदा भोये, सर्व अंगणवाडी सेविका, आशा सेविका, गरोदर, स्तनदामाता पालक, किशोरी मुली, बालके व इतर माता सहभागी झाले होते.
नगरसेविका मनीषा जामसंडेकर यांचे स्वागत डॉ.अर्चना मर्गज यांनी केले डॉ. अर्चना मर्गज यांचे स्वागत भोये यांनी केले. भोये यांचे स्वागत सोनाली जाधव अंगणवाडी सेविका यांनी केले. आशा यांचे स्वागत दीपिका भुजबळ व दिपाली शेटगे यांनी केले. अंगणवाडी सेविका सोनाली जाधव यांनी पोषण महा विषयी माहिती दिली. नगरसेविका मनीषा जामसंडेकर यांनी स्वच्छतेविषयी मार्गदर्शन केले. यावेळी पोषण रॅली काढण्यात आली. पौष्टीक आहार प्रात्यक्षिक सादरीकरण करण्यात आले. उपस्थितांना अल्पोपहार देऊन व आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंगणवाडी सेविका, आशा यांनी विशेष मेहनत घेतली.
राष्ट्रीय पोषण महा कार्यक्रम अंगणवाडी केंद्र जामसंडे टापू येथे साजरा
