कणकवली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा उदया खारेपाटण येथे शुभारंभ

⚡कणकवली ता.११-: खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक  मंडळ संचलित, शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स आणि उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम, खारेपाटण या प्रशालेमध्ये कणकवली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. 12 व 13 सप्टेंबर असे दोन दिवस चालनारे प्रदर्शन जिल्हा शिक्षण विभाग, पंचायत समिती, कणकवली यांच्यावतीने आयोजित केले आहे.

या विज्ञान प्रदर्शनामध्ये कणकवली तालुक्यातील 85 प्राथमिक शाळा व 35 माध्यमिक शाळा सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर या प्रत्येक शाळेतून एक विद्यार्थी वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धेमध्ये सहभाग घेणार आहेत. 

या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन कणकवली आमदार नितेश राणे,  यांच्या हस्ते होणार आहे. तर यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, कणकवली उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने, कणकवली तहसीलदार रमेश पवार, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. मुश्ताक शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे, कणकवली गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, मोहन भोई, खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत आणि संस्था पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. 

या भव्य दिव्य तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष रघुनाथ राणे, सचिव महेश  कोळसुलकर, खजिनदार संदेश धुमाळे, सहसचिव राजेंद्र वरूणकर तसेच संस्थेचे सर्व संचालक तसेच प्राचार्य संजय सानप व सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कणकवली तालुक्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी शिक्षक वृंद तसेच तालुक्यातील सर्व नागरिक यांना केलेले आहे.

या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभागी स्पर्धकांची भोजन व्यवस्था शेठ न. म. विद्यालय व जुनिअर कॉलेजच्यावतीने करण्यात आलेली आहे, याची तालुक्यातील सर्व स्पर्धक  प्रशालेंनी नोंद घ्यावी.

You cannot copy content of this page