⚡कणकवली ता.१०-: कणकवलीत गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.. म्हणत जल्लोषी मिरवणूक चालली होती.त्या मिरवणुकीत गणेश भक्तांच्या उत्साह वाढवण्यासाठी स्वतः अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी ढोल वाजवत सहभाग दर्शविला.
सिंधू गर्जना ढोल पथकाचा ढोल स्वतःच्या हाती घेत गणेश विसर्जन मिरवणुकीत अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी स्वतः ढोल वादन करत ठेकाही धरला. समाजातील साधेपणाचा अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांचे कौतुक होत आहे.
सिंधु गर्जना ढोल पथकाला त्यांनी यावेळी शुभेच्छा देखील दिल्या. स्वतः ऑन ड्युटी असताना गणेश विसर्जन मिरवणुकीचा आढावा घेण्याकरिता कणकवलीत आलेल्या नितीन बगाटे यांच्यातील हा उस्फूर्तपणा मात्र या मिरवणुकीत सहभागी झालेल्या अनेकांना भावला. बैलगाडी शर्यतींना काही महिन्यांपूर्वीच न्यायालयाकडून सशर्थ परवानगी मिळाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वप्रथम वैभववाडी येथे झालेल्या बैलगाडी स्पर्धेत स्वतः बैलगाडी चालवून बगाटे यांनी आपल्यातील सर्वसामान्यपणा दाखवून दिला. त्यातच काल कणकवलीत आलेल्या श्री. बगाटे यांनी महापुरुष मित्र मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत स्वतः सहभाग घेत सिंधु गर्जना ढोल पथकाचा ढोल हाती घेतला. श्री बगाटे यांच्यातील एक कलावंत खाकी वर्दीचा थाट बाजूला ठेवून जनतेत मिसळला हे अनेकांना यावेळी भावले.
सिंधुदुर्ग अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिरवणुकीत ढोल
वाजवतात तेव्हा….
