मालाड येथील अथर्व गिरकर याने मिळविला प्रथम क्रमांक
⚡बांदा ता.१०-: सिंधुदिशा शैक्षणिक व सामाजिक संस्था विद्यार्थ्यांचा कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी अनेक स्पर्धात्मक कार्यक्रम व सामाजिक उपक्रम राबवत असते. दरवर्षी प्रमाणे संस्थेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय बाल अभंग गायन स्पर्धेत मुंबई मालाड येथील अथर्व उदय गिरकर याने प्रथम क्रमांक मिळविला.
वृत्तीका कृष्णा परब- भांडुप (मुंबई) यांनी द्वितीय तर जय समिर राऊळ- (पिगुळी-सिंधुदुर्ग) यांनी तृतीय क्रमांक मिळविला. चिन्मयी निलेश मेस्त्री ( इन्सुली- सावंतवाडी), कौशल्य शशिकांत पवार ( उस्मानाबाद), मंदार बापु नाईक (तुळस खरीवाडी, ता. वेंगुर्ला) यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला. विशेष उत्तेजनार्थ क्रमांक ममता दत्तप्रसाद प्रभु (आजगांव- सावंतवाडी), तेजल रविंद्र गावडे ( आसोली- वेंगुर्ला), नितेश दत्ता राऊळ (कोलगांव- सावंतवाडी), धिरज अमित मेस्त्री (ओरोस, सिंधुदुर्ग) यांना देण्यात आलेत. स्पर्धेचे परिक्षण संगित क्षेत्रातील संगितरत्न अरुण म्हात्रे बुवा यांनी केले. संस्थाध्यक्ष रुपेश परशुराम परब यांच्या मार्गदर्शनाखाली
स्पर्धेचे नियोजन मुकेश नाईक, राजेश सावंत, प्रशांत परशुराम परब, संतोष ओटवणेकर, विलास राऊळ, विलास गवस, रितेश नाईक, देवेंद्र नाईक, अनिल गावडे, रजत गवस, पुंडलिक जाधव यांनी केले.
फोटो :-
स्पर्धेतील प्रथम क्रमांक प्राप्त अथर्व उदय गिरकर.
