पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबरपासून सेवा पंधरवडा उपक्रम

भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली माहिती

⚡कणकवली ता.१०-: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 17 सप्टेंबर रोजी वाढदिवस असून वाढदिवसानिमित्त सेवा सुशासन आणि गरीब कल्याणकारी योजना राबवून सेवा पंधरवडा 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कणकवली येथील भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली
बोलत होते. यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई , किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस प्रफुल्ल प्रभू उपस्थित होते.

सेवा पंधरावड्यानिमित्त एकूण 17 सेवाभावी उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येणार असल्याची माहिती राजन तेली यांनी दिली. 2025 पर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यासह देश क्षयमुक्त करण्यासाठी विविध आरोग्य शिबीर जिल्ह्यात आयोजित करण्यात येणार आहे. वृक्षलागवड केली जाणार आहे. स्वच्छता अभियान सुद्धा राबविण्यात येणार आहे. वाड्या वस्त्या, पाणी स्त्रोत स्वच्छ करणे आदी उपक्रम राबविले जनावर आहेत. व्होकल फॉर लोकल च्या माध्यमातून स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बुद्धिजिवी वर्गाशी सुसंवाद साधण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या जनहिताच्या विविध योजना जनतेपर्यंत पोचविण्यात येणार आहेत. भाजपा युवा मोर्चा च्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहेत. आरोग्य शिबीर सुद्धा घेण्यात येणार आहेत. तसेच जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना आवश्यक कृत्रिम अवयव देण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील वृद्दाश्रमांना विविध वस्तूवाटप केले जाणार आहे. सेवा पंधरवड्यासाठी संयोजकपदी प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, सहसंयोजकपदी मनोज रावराणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page