⚡मालवण ता.०९-: मालवण तालुक्यातील धामापूर बौद्धवाडी येथे कर्ली खाडीच्या पात्रात काल गुरुवारी रात्री एका अनोळखी महिलेचा मृतदेह ग्रामस्थांना सापडून आला. याबाबत मालवण पोलिसांना माहिती दिल्यावर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन या मृतदेहाचा पंचनामा केला. मात्र महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही.
या महिलेचा चेहरा गोलाकार असून वय अंदाजे ५० वर्षे आहे. तिच्या अंगावर हिरव्या रंगाचा ब्लाउज, लाल रंगाचा परकर, सोन्याचे मंगळसूत्र, कानात रिंग, नाकात फुली आहे, अशी माहिती मालवण पोलिसांनी दिली आहे. याबाबत मालवण पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक श्री. नरळे हे अधिक तपास करत आहेत.
