दांडी रांजनाल्यातील दुर्गंधी दूर करण्याची मागणी

⚡मालवण ता.०९-: दांडी मोरेश्वरवाडी भागातील रांज नाल्यातील दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे आरोग्यविषयक व इतर समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे या दुर्गंधीयुक्त पाणीप्रश्री शिवसेना उपशहरप्रमुख सन्मेश परब आणि तपस्वी मयेकर यांनी स्थानिक नागरिकांसमवेत मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे यांना निवेदन सादर करून ही दुर्गंधी तातडीने दूर करण्याची मागणी केली.

यावेळी या भागातील रहिवासी मंदार आडकर, रोहन कुमठेकर, जयंत तारी, मनीष भगत, सुशांत तारी, ऋषी तोडणकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page