अपघातप्रवण रस्त्याची श्रमदानातून वाढवली रुंदी

⚡मालवण ता.०९-:
मालवण-आचरा रोडवरील कोळंब ग्रामपंचायतीनजीकच्या एका धोकादायक वळणावर वारंवार अपघात होत असल्याने या वळणावर डांबरीकरण करून रस्ता रुंद करण्याची मागणी अनेकदा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती. मात्र याकडे बांधकाम विभागाने सातत्याने दुर्लक्ष केल्याने बांधकाम विभागाचा निषेध व्यक्त करीत अखेर ग्रामपंचायत सदस्य गणेश आचरेकर यांच्या मित्रमंडळाने स्व:खर्चातून रस्त्यालगत जांभा दगड बसवून रस्त्याची रुंदी वाढविली आहे. यासाठी अनेकांनी श्रमदानात सहकार्य केले.

या अपघातप्रवण रस्त्याची रुंदी वाढविण्याबाबत ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनाला केराची टोपली दाखविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होत होते. ग्रामपंचायतीनेही याविषयी आक्रमक भूमिका घेत बांधकाम विभागाचे लक्ष वेधले होते. मात्र त्याकडेही बांधकाम विभागाने सोयीस्करपणे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे या मार्गावरील अपघाताची मालिका खंडित होतच नव्हती. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य गणेश आचरेकर यांच्या मित्रमंडळाने स्व:खर्चातून रस्त्यालगत जांभा दगड बसवून रस्त्याची रुंदी वाढविली आहे. अपघातप्रवण रस्ता बनल्याने काही प्रमाणात त्याची रुंदी वाढविण्याचेही सौजन्य बांधकाम विभागाकडून दाखविण्यात येत नसल्याने फक्त निषेध नोंदवून गप्प न बसता आचरेकर यांनी यासाठी आर्थिक खर्चही करीत रस्त्याची रुंदी वाढविली आहे.

You cannot copy content of this page