आमदार टी. राजासिंह यांना सुरक्षा पुरविण्याची मागणी

⚡मालवण ता.०९-: गोशामहल (तेलंगणा) येथील प्रखर हिंदुत्ववादी आमदार टी. राजासिंह यांना २३ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. त्यांच्यावर एका पंथीयांच्या श्रद्धास्थानांचा कथित अपमान केल्याचा आरोप आहे या प्रकरणी जामीन मिळाल्यानंतर अन्य एका जुन्या प्रकरणात त्यांना पुन्हा अटक करण्यात आली. आमदार टी. राजासिंह यांना अटक करण्यापुर्वी
आणि अटक केल्यानंतर जिहादी प्रवृतीच्या धर्माधांकडून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत या पार्श्वभूमीवर त्यांना सशस्त्र सुरक्षा पुरवावी अशी मागणी राज्यपाल, तेलंगणा यांच्याकडे हिंदू जनजागृती समिती मार्फत करण्यात आली आहे. या निवेदनांची प्रत हिंदू जनजागृती समिती मालवण शाखेतर्फे मालवणचे नायब तहसिलदार आनंद मालवणकर यांच्याकडे देण्यात आली. यावेळी समितीचे रत्नाकर कोळंबकर, सुहास दुदवडकर, मधुसूदन सारंग, महेंद्र पाताडे, राजन कामत, राजन सकपाळ, अनिकेत फाटक आदी यावेळी उपस्थित होते.

You cannot copy content of this page