माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर व नगरसेवकांची होती मागणी;खा विनायक राऊत, आ वैभव नाईक यांनी उपलब्ध केला निधी
मालवण दि प्रतिनिधी
मालवणचे तत्कालीन नगराध्यक्ष महेश कांदळगावकर व नगरसेवक यांच्या मागणीनुसार खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या शासन निधीतून वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत मालवण नगरपालिकेच्या माध्यमातून मालवण शहरात १८ ठिकाणी कॅनव्हेस मिरर बसविण्यात आले आहेत. अवघड वळणाच्या रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी हे मिरर बसविण्यात आले आहेत.
मालवण शहरात अरुंद रस्ते व काही अवघड वळणे यामुळे अपघाताची शक्यता असल्याने हे कॅनव्हेस मिरर वाहनचालकांना उपयोगी ठरणार आहेत. माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या संकल्पनेतून आणि शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवकांच्या सहकार्यातून हे काम मार्गी लागले, अशी माहिती माजी नगरसेवक मंदार केणी यांनी दिली.
मालवण शहरात राज्य मार्ग १८२ देऊळवाडा सातार्डेकर कॉर्नर, चिवला बीच रोड (पंत वालावलकर) बोर्ड खाली (पोस्टमार्टम), रेवतळे मत्स्यालय कॉर्नर, वाघ पिंपळ महापुरुष मंदिर जंक्शन, आना-नाना हॉटेल विदयुत पोल नं. M-8, रायकर हॉस्पीटल जंक्शन (सामंत जंक्शन), राज्य मार्ग १८२ ते नेवाळकर गल्ली, काळबादेवी रोड जंक्शन मंत्री घर, डॉ. नंदू वझे तिठा, रेवतळे शाळा जंक्शन, रामेश्वर कॉम्प्लेक्स जंक्शन धुरीवाडा काजू फॅक्टरी जंक्शन, वालकर कॉर्नर, गर्देरोड दांडी रोड जंक्शन पिंटो गॅरेजजवळ, दांडी शाळा कॉर्नर, भंडारी हायस्कूल सभागृह कॉर्नर, पंकज सादये घरालगतचा कॉर्नर, आडारी रोड जंक्शन याठिकाणी हे मिरर बसविण्यात आले आहेत.
