⚡मालवण ता.०८-: महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर चे अध्यक्ष श्री. ललित गांधी यांनी त्यांच्या ललित गांधी फाऊंडेशनच्या वतीने श्री सद्गुरु सदानंद माऊली एज्यूकेशनल फाऊंडेशन संचालित मालवण येथील डॉ. एस्.एस्. कुडाळकर हायस्कूल आणि प्राथमिक शाळेमधील विद्यार्थ्यांसाठी २७ सीटर स्कूल बस नुकतीच संस्थेस देणगी दाखल दिली आहे.
स्कुल बस संस्थेकडे दाखल झाल्यानंतर बसचे संस्थेचे अध्यक्ष श्री. विलास झाड यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यावेळी संस्थेचे सचिव श्री. भालचंद्र राऊत, संचालक श्री. विनायक निवेकर, देवदत्त माडये मुख्याध्यापिका सौ. नंदिनी साटलकर, सौ. प्राची परब आणि सर्व सभासद उपस्थित होते. या गाडीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करणे सोयीचे होणार आहे. गाडी उपलब्ध करुन दिल्याबद्दल संस्थेच्या वतीने श्री. ललित गांधी यांचे आभार मानण्यात आले.
