विद्युत लाईनचा स्पर्श होवून वृद्धाचे निधन

बापार्डे गायकवाड येथील दुःखद घटना


देवगड प्रतिनिधी
पोलावरील तुटून पडलेल्या विद्युत वाहिनीचा स्पर्श होऊन वृद्धाचा मृत्यू
बापर्डे गायकवाड वाडी येथील दीनानाथ वसंत गायकवाड (वय 68 वर्षे) रा.बापर्डे हे 7 सप्टेंबर रोजी दळण घेउन पिठाच्या गिरणीवरती जात असताना पायवाटेवरती ईलेट्रिक पोलवरती तुटलेल्या तारेचा र्स्प्श होउून त्यांचा विजेचा धक्का लागून ते जागीच मृत्यूमुखी पावले आहेत. सदरची घटना हि दिनांक 7 सप्टेंबर रोजी दुपारी 3.15 ते रात्री 9 वा. सुमारास घडली आहे. देवगड पोलीस ठाण्यामध्ये सदर घटनेची आकस्मिक मृत्यूची नोंद देवगड पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आलेली आहे.


पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार बापर्डे गायकवाड वाडी येथील दीनानाथ वसंत गायकवाड हे 7 सप्टेंबर रोजी दुपारी 3.15 वा. सुमारास आपल्या घरामधून काहि अंतरावरती असलेल्या पिठाच्या गिरणीवरती दळण घेवून पायी जात असताना बापर्डे हेळयाची भाटी येथे ओहोळाच्या किनारी विदयुत वाहिन्यांच्या तारा तुटून खाली पडल्या होत्या. सदर तारांना गायकवाड यांचा स्पर्श होवून विजेच्या धक्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. सदरची खबर देवगड पोलीस ठाण्यामध्ये श्रीकांत दिनानाथ गायकवाड यांनी दिली आहे. अधिक तपास देवगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली देवगड पोलीस करीत आहेत.

You cannot copy content of this page