नागरिकांत समाधान
देवगड प्रतिनिधी
देवगड तालुक्यामधील पीएम किसान योजनेच्या बहुतांश लाभार्थ्यांनी ई-केवायसी केली नसल्याने बहुतांश लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार होते. बापर्डे ग्रामपंचायतीने बापर्डे गावामधील पीएम किसान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांची ई-केवायसी घरोघरी जावून पुर्ण केली आहे. यामुळे बापर्डे ग्रामपंचायतीचे सर्व स्तरावरुन कौतुक करण्यात येत आहे.
तालुक्यातील पीएम किसान योजनेतील 6112 लाभार्थ्यांनी पीएम किसान योजनेची ई-केवायसी केली नव्हती यामुळे या योजनेचा अनुदानाचा 12 वा हप्ता मिळण्यापासून लाभार्थ्यांना वंचित रहावे लागणार होते. 1 सप्टेंबर 2022 पर्यंत ई केवायसी नोंद करणे संदर्भात सूचना शासन स्तरावरुन आल्या होत्या. बापर्डे ग्रामपंचायतीचे सरपंच संजय लाड व ग्रामसेवक शिवराज राठोड यांनी पुढाकार घेवून गावामधील पीएम किसान योजनेपासून कोणतीही व्यक्ती वंचीत राहू नये म्हणून आपले सरकार सेवा केद्राचे केंद्रचालक सचिन नाईकधुरे व ग्रामपंचायत कर्मचारी स्वप्नील तिर्लोटक्र यांनी घरोघरी जावून ई केवायसीची नोंद केली आहे. यामुळे बापर्डे ग्रामपंचायतीचे सर्व स्तरावरुन कौतुक करण्यात येत आहे. याआधी बापर्डे ग्रामपंचायतीने शासनाच्या आलेल्या विविध योजनांची तात्काळ अंमलबजावणी करुन अनेक योजना राबविल्या आहेत. स्मार्ट ग्राम, बायोगॅस सनियंत्रण योजना,निर्मल ग्राम अशा विविध योजना राबवून बापर्डे गावाचे नाव उज्वल केले आहे.
फोटो- लाभार्थ्यांच्या घरी जावून ईकेवायसी करताना सचिन नाईकधुरे व स्वप्नील तिर्लोटक्र आदी.
