Headlines

उत्कर्ष मंडळ मुंबई (टेंबवाडी) तर्फे गणेश चतुर्थीचे औचित्य साधून शैक्षणिक साहित्य वाटप

⚡बांदा ता.०८- : उत्कर्ष मंडळ मुंबई(टेंबवाडी) आयोजित विलवडे नं.२ शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना गणेश चतुर्थीची आैचित्य साधून दरवर्षी प्रमाणे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.यामध्ये वह्या,स्कूल बॅग,कंपास, वॉटरबॅग, पेनड्राईव्ह शाळेला संगणक संच,साउंडसिस्टिम आदी साहित्याचे वाटप करण्यात आले.
माजी उपसभापती कृष्णा सावंत तर बांदा केंद्र प्रमुख संदीप गवस, मंडळाचे अध्यक्ष अरुण सावंत यांच्या उपस्थित सर्व वि्दयार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष कृष्णा सावंत यांनी उत्कर्ष मंडळाच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. यावेळी प्रतिक सावंत व प्रणव दळवी यांचा विशेष गौरव करण्यात आला .यावेळी केंद्रप्रमुख नरेंद्र सावंत,शाळा व्यव समिती अध्यक्ष रश्मी सावंत,उपाध्यक्ष प्राजक्ता दळवी, मोहन सावंत माजी उपसरपंच प्रकाश दळवी,लक्ष्मीकांत सावंत,देवानंद सावंत,आशिका सावंत,लक्ष्मण सावंत,पूर्वा दळवी,मानसी सावंत,समीक्षा सावंत, विश्वास सावंत,सुभाष कानसे,भालचंद्र गवस,महेंद्र सावंत,धनश्री सावंत ,माधुरी सावंत, संजय सावंत,समिधा सावंत व उत्कर्ष मंडळाचे सर्व सदस्य, सीमा दळवी, मनाली दळवी व लांबर गुरुजी,शाळेचे सर्व आजी माजी विद्यार्थी,सर्व पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश काळे तर आभार सचिन शेळके यांनी मानले.
फोटो : गणेश चतुर्थीचे आैचित्य साधून उत्कर्ष मंडळ मुंबई(टेंबवाडी) मंडळाच्या वतीने विलवडे नं. २ प्रशालेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. (छाया: अजित दळवी)

You cannot copy content of this page