⚡सावंतवाडी ता.०८- : अनेक गावे, वाड्या वस्तीतील शालेय विधार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या सेवेत येण्याचा ध्यास घेतलेले व त्यासाठी स्वतःचे तन, मन, धन व महत्वाचे म्हणजे वेळ खर्चून आवश्यक असलेले मार्गदर्शन मोफत देणारे ‘तिमिरातुनी तेजाकडे’ या संस्थेचे संस्थापक सत्यवान रेडकर (कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार) यांनी गुरुवारी सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास भेट दिली.
यावेळी सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांनी सत्यवान रेडकर यांना कार्यालयातर्फे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच रेडकर यांच्याकडून होत असलेल्या शैक्षणिक चळवळीच्या अनुषंगाने सामाजिक कार्यासाठी शुभेच्छाही दिल्या.
यावेळी कार्यालयातील चैतन्य बकरे, अरुण पाटील, प्रवीण सातारे, अमित पाटील व अमित नायकवडी हे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक तसेच सुनील खंदारे, कालिदास झणझणे व राधा बसनकर आदी कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
