ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्याशी १२ सप्टेंबरला मुक्त संवाद कार्यक्रमाचे आयोजन…

वेंगुर्ला प्रतिनिधी- बॅ.नाथ पै जन्मशताब्दी वर्षानिमित्त वेंगुर्ला नगरवाचनालय आणि बॅ.नाथ पै सेवांगण, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता वेंगुर्ला नगरवाचनालय येथे ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यच्याशी मुक्त संवाद साधण्यात येणार आहे.

  वर्तमान राजकीय, सामाजिक आणि साहित्य-संस्कृती विषयी पठारे यांच्याशी संवाद साधला जाणार आहे. यावेळी डॉ.महेश केळुसकर, संध्या नरे-पवार, सुमती लांडे आणि अॅड.देवदत्त परुळेकर आदी संवादक म्हणून काम पहाणार आहेत. तरी साहित्य प्रेमी आणि सुज्ञ नागरिकांनी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन वेंगुर्ला नगरवाचनालयाचे कार्याध्यक्ष अनिल सौदागर आणि बॅ.नाथ पै सेवांगण मालवणचे कार्याध्यक्ष दीपक भोगटे यांनी केले आहे.
You cannot copy content of this page