रिक्षाचालकाचा असाही प्रामाणिकपणा

पोलिसांनीही केले कौतुक

⚡कणकवली ता.०५-:
रिक्षाने कणकवलीहून ओरोस येथे सोडलेल्या महिला प्रवाशाची बॅग रिक्षातच राहील्याचे रिक्षाचालक सिद्धू उर्फ सिद्धार्थ शिवराम कदम (४०, वरवडे ) यांच्या लक्षात आले. त्यांनी बॅग कणकवली पोलीस ठाण्यात सुपूर्द केली. पुढे बॅगेत सापडलेल्या कागदपत्रानुसार पोलिसांनी महिलेशी संपर्क साधून बॅग तिच्याकडे सुपूर्द केली. सिद्धार्थ यांच्या प्रमाणिकपणाचे पोलिसांनीही कौतुक केले.

घटना अशी, सिद्धार्थ हे येथील जुन्या पोस्टानजीक रिक्षा व्यवसाय करतात. रविवारी सकाळी १० वा. सुमारास सौ. योगिता शंकर कांबळे (रा. ओरोस) या ओरोस येथे जाण्यासाठी सिद्धार्थ यांच्या रिक्षात बसल्या. ओरोसला पोहोचल्यानंतर त्या रिक्षातून उतरल्या व रिक्षाभाडे देऊन निघून गेल्या. पुढे कणकवलीत परतलेल्या सिद्धार्थ यांना योगिता यांची बॅग रिक्षातच राहील्याचे लक्षात आले. सिद्धार्थ यांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठले. पोलीस हवालदार मिलिंद देसाई यांनी तपासणी केली असता बॅगेत पैसे नसले तरी महत्वाची कागदपत्रे दिसून आली. त्याआधारे देसाई यांनी योगिता यांना बोलावून बॅग सुपूर्द केली. सिद्धार्थ यांच्या प्रामाणिकपणाने भारावलेल्या योगिता यांनी त्यांना बक्षिस देण्याचा प्रयत्न केला. मात्र, सिद्धार्थ यांनी ते नम्रपणे नाकारले. त्यानंतर योगिता यांनी पुष्पगुच्छ देत सिद्धार्थ यांचे आभार मानले.

You cannot copy content of this page