⚡कणकवली ता.०२-: सत्यशोधक सेक्युलट फ्रंट महाराष्ट्र यांच्यातर्फे दोन दिवसीय कार्यकर्ता शिबिराचे आयोजन शनिवार ३ व रविवार ४ सप्टेंबरला कणकवली येथील म्हाळसाबाई भांडारकर स्मारक ट्रस्ट येथे करण्यात आले आहे. शिबिरात विविध विषयांवर चचासत्रे व मार्गदर्शन होणार आहे.
शिबिराचे उद्घाटन ३ रोजी सकाळी ११ वा. ज्येष्ठ विचारवंत व लेखक जगदीप मोरे यांच्या हस्ते होणार असून ज्येष्ठ विचारवंत प्रा. गौतमीपुत्र कांबळे मार्गदर्शन करणार आहेत. प्रास्ताविक प्रा. वासंती तेंडोलकर, सूत्रसंचालन इनायत परदेशी करणार आहेत. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या शमा दलवाई, लेखक प्रा. डॉ. सोमनाथ कदम, प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर, नाटककार डॉ. अनिल सरमळकर, दर्पण प्रबोधिनीचे अध्यक्ष आनंद तांबे, अँड. एकनाथ ढोकळे, अँड. सुदीप कांबळे उपस्थित असणार आहेत. दुपारी २ वा. ‘सेक्युलॅरिझम तत्व, अर्थ आणि अन्वयार्थ’ याविषयावर चर्चासत्र असून सूत्रसंचालन एम. पी. जाधव करणार आहेत. सायंकाळी ५.३० वा. दुःख गुलामगिरी आणि शोषणमुक्त समाजासाठी असणारी तत्त्वज्ञाने’ याविषयी चर्चासत्र असून सूत्रसंचालन संजय जाधव करणार आहेत. ७.३० वा. चर्चा, संवाद, प्रश्नोत्तरे असून सूत्रसंचालन अतुल खरात करणार आहेत रात्री ९.३० वा. शाहीर प्रविण खाडे, शाहीर धम्मरक्षित रणदिवे, सायली कदम यांचा शाहीरी जलसा, समतादूत सगुण जाधव यांचा ‘संत गाडगेबाबा एकपात्री प्रयोग होणार आहे.
४ रोजी सकाळी ९ वा. ‘जात वर्ग स्त्रीदास्यमुक्तीसाठी सांस्कृतिक व राजकीय पर्याय याविषयी चर्चासत्र असून सूत्रसंचालन वाय. जी. कदम करणार आहेत. त्यानंतर प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांचे सक्युलेरिझमसमोरील आजची आव्हाने’ हे समारोपाचे अध्यक्षीय भाषण असून सूत्रसंचालन शरद मणचेकर करणार आहेत. याप्रसंगी युवा नेते डॉ. जालिंदर घिगे, सामाजिक कार्यकर्ते अतुल बाघ, प्रा. सिद्धार्थ तांबे, दर्पण प्रबोधिनीचे संदेश कदम, सत्यशोधक सेक्युलर फ्रंटचे राज्य निमंत्रक संग्राम सावंत आदी उपस्थित राहणार आहेत. शिबिरास उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी अँड. सुदीप कांबळे (९९६०८०३३०१ ) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
