गणेश चतुर्थी निमित्त तालुका काँग्रेसकडून गरीब कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप…

⚡सावंतवाडी ता.०२-: गणेश चतुर्थी निमित्त सावंतवाडी तालुका काँग्रेसच्या वतीने सालईवाडा भागातील कोळेकर कुटुंबाला मदतीचा हात पुढे करत त्यांना अन्नधान्य आणि साहित्य वाटप करण्यात आले आहे. यावेळी कोळेकर कुटुंबीयांनी त्यांचे आभार मानले.

दरवर्षी गणेश चतुर्थी निमित्त सावंतवाडी काँग्रेसच्या वतीने शहरातील गोरगरिबांना अन्नधान्याचे साहित्य वाटप करण्यात येते. यावर्षी देखील काँग्रेसच्या वतीने शहरात गरिबांना अन्नधान्य आणि साहित्य वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे अनेकाने काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहे.

यावेळी जिल्हा काँग्रेसचे नेते गुरुनाथ आईर,तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर शहराध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर बबन डिसोजा, बबलू डिझोजा, पाॅल फर्नांडिस,आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page