सार्वजनिक कामांच्या जागेचा प्रश्न ठरतो अडचणीचा

लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी तोडगा काढावा;जिल्हा सरपंच संघटना संघटक सुरेश गावडे यांची मागणी

⚡सावंतवाडी ता.०२-: ग्रामपंचायत मध्ये काम करत असताना सार्वजनिक जागे सदर्भात अडचणी निर्माण होत असून, काहीवेळा मुद्दाम ह्या अडचणी निर्माण केल्या जातात. यावर बांधकाम मंत्रालय, ग्रामविकास मंत्रालय आणि महसूल मंत्रालय च्या लोकप्रतिनिधींनी आणि अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन बैठक घेऊन तोडगा काढावा अशी मागणी जिल्हा सरपंच संघटनेच्या वतीने जिल्हा संघटक सुरेश गावडे यांनी दिले आहे.

यावेळी जिल्हा सरपंच संघटना सचिव तथा कुडाळ पणदूर सरपंच श्री दादा साईल्,सावंतवाडी तालुका सचिव तथा नाणोस सरपंच श्री वासुदेव जोशी,कीनळे सरपंच श्री दिपक नाईक,तळवडे सरपंच सौ. मेस्त्री .,मळगाव सरपंच सौ. जामदार,निरवडे सरपंच श्री हरी वारंग,बांदा सरपंच श्री अक्रम खान,कोनशी,सरपंच श्री सुभाष सावंत,केसरी सरपंच श्री देवेंद्र सावंत, कुणकेरी सरपंच श्री विश्राम सावंत,सातुळी.बावळाट सरपंच श्री दीनानाथ कशाळीकर,इन्सुली सरपंच श्री तात्या वेंगुर्लेकर,निगुडे सरपंच श्री समीर गावडे,वेर्ले सरपंच श्री सुरेश राऊळ,धाकोरे उपसरपंच श्री. गावकर, नहावेली सरपंच सौ प्रतिभा गावडे,इन्सुली उपसरपंच श्री काका चाराटकर,मळगाव उपसरपंच श्री. हनुमंत पेडणेकर,तळवणे येथून श्री समीर रेडकर नेमळे यजमान सरपंच श्री विनोद राऊळ,ओवळीये उपसरपंच , तळवणे माजी उपसरपंच श्री. केरकर, आदि उपस्थित होते.

You cannot copy content of this page