नांदगाव येथील शिष्टमंडळाने केली कार्यकारी अभियंता यांच्याकडे मागणी
⚡कणकवली ता.०२-: नांदगाव विभागातील वारंवार होत असलेल्या खंडित विज पुरवठाबाबत नांदगाव येथील शिष्टमंडळाने कणकवली येथील कार्यकारी अभियंता श्री. मोहीते यांना निवेदन देण्यात आले आहे.तात्काळ समस्या सोडवून पर्यायी व्यवस्था निर्माण करावी अशी मागणी केली आहे.
गणेश उत्सव काळात विज पुरवठा खंडित झाल्याने अभियंता यांनी झालेल्या त्रासाबाबत दिलगिरी व्यक्त केली असून काल 11 केवी कंडक्टर तुटला होता,जंगली भाग असल्यामूळे जोडण्यास उशिर झाला होता.
तसेच पर्यायी व्यवस्था म्हणून ९० किलो मीटर लाईन चे दोन विभाग करुन देण्याचे आश्वासन दिले आहे.
खारेपाटण सब स्टेशन वरून नांदगाव ला ३३ केवी पर्यायी पुरवठा देण्याचा प्रस्ताव लवकरच मार्गी लावू अशी हमी ही दिली आहे.
तसेच कर्मचाऱ्यांना ग्राहकांशी योग्य समन्वय साधून सौजन्य पूर्ण वागण्याची सुचनाही यावेळी कनिष्ठ अभियंता यांच्या मार्फत देण्यात आली आहे. तसेच नांदगाव कनिष्ठ अभियंता यांना सदर विद्युत केंद्रातील गावच्या सरपंच यांचा गृप करून विद्युत पुरवठा संदर्भात वेळोवेळी अपडेट देण्याचे ही कार्यकारी अभियंता श्री मोहीते यांनी सुचित केले आहे.यावेळी श्री बगाडी उपस्थित होते.
भाजपचे शक्ती केंद्र प्रमुख भाई मोरजकर, नांदगाव उपसरपंच निरज मोरये,राजू खोत, कमलेश पाटील,राजू तांबे, ऋषिकेश मोरजकर, आनंद तांबे, नांदगाव विभागाचे कनिष्ठ अभियंता श्री पंडित आदी उपस्थित होते.
