दीपक केसरकर मित्र मंडळाचे शिक्षक पुरस्कार जाहीर,

सावंतवाडीत ११ सप्टेंबरला वितरण

⚡सावंतवाडी ता.०२- : येथील दीपक केसरकर मित्र मंडळ यांच्या वतीने देण्यात येणारे ‘गुरुसेवा शिक्षक पुरस्कार – २०२२ जाहीर झाले आहेत. शिक्षक दिनाचे औचित्य साधत जिल्ह्यातील शिक्षकांचा सन्मान गुरु सेवा पुरस्काराने ११ सप्टेंबरला सावंतवाडीत करण्यात येणार आहे.

या पुरस्काराने प्राथमिक, माध्यमिक व अंगणवाडी शिक्षक – शिक्षिकांचा समावेश करीत त्यांचा गौरव केला जातो. पुरस्काराचे यंदा दहावे वर्ष आहे. या दशकपूर्ती निमित्त उपक्रमशील, प्रयोगशील व सामाजिक क्षेत्रातील कार्यरत असणारे अभिनव उपक्रम राबविणाऱ्या शिक्षकांची निवड केली जाते. यात सावंतवाडी मधून रुपाली सलामवाडे (केंद्र शाळा चौकुळ नंबर -१), अनिल कांबळे (नेमळे पंचक्रोशी हायस्कूल, नेमळे ), दोडामार्गमधून वृषाली गवस (जिल्हा परिषद शाळा मांगेली) व अंकुश मिरकर (माध्यमिक विद्यालय, आयी ), वेंगुर्ले तालुक्यातून पांडुरंग चिंदरकर (मठ शाळा नंबर १), आणि संतोष पवार (के. के. चमणकर हायस्कूल, आडेली), मालवण तालुक्यातून पांडुरंग कोचरेकर (केंद्र शाळा, आचरा नंबर १), भगीरथ चिंदरकर (माध्यमिक विद्यामंदि, असरोंडी) तर कुडाळ तालुक्यातून विलास गोठसकर (जिल्हा परिषद शाळा, कांदोळी ), तानाजी काळे (एस. एल. देसाई विद्यालय), कणकवलीमधून राजेश कदम (जिल्हा परिषद शाळा,ओटव) प्रसाद राणे (विद्यामंदिर हायस्कूल, कणकवली), देवगड तालुक्यातून संतोष कदम (जिल्हा परिषद शाळा, कुमकुवण), संजीवनी फडके (पडेल हायस्कूल, पडेल) तर वैभववाडी तालुक्यातून विवेकानंद कडू (जिल्हा परिषद शाळा विद्यामंदिर, ऐणारी) यांचा सन्मान करण्यात येणार आहे. पुरस्कार विजेत्यांना प्रशस्तीपत्र, रोख रक्कम, शाल, श्रीफळ देऊन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम ११ सप्टेंबरला सकाळी साडेदहा वाजता आमदार निवास, श्रीधर अपार्टमेंट, एसटी स्टँड समोर, सावंतवाडी येथे होणार आहे.
ग्रामीण भागात कार्य करणाऱ्या शिक्षक – शिक्षिकांच्या कार्याचा गौरव करण्यात दीपक केसरकर मित्रमंडळाचे नियमित सहकार्य असते. या निवड समितीत भरत गावडे, विठ्ठल कदम, प्रा. रुपेश पाटील, अजय सावंत, महादेव सातपुते आदींचा समावेश आहे.

चौकट :
पाच जणांना विशेष सन्मान
यंदाच्या पुरस्कारांतर्गत कोविड काळात शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात अधिक सहभाग घेऊन वाडी-वस्तीवर आरोग्य सेवा व अध्यापन केल्याबद्दल पाच शिक्षकांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. यात सागर मेस्त्री (जिल्हा परिषद शाळा, ओटवणे), संगीता सोनटक्के (जिल्हा परिषद शाळा, शिरशिंगे), श्रुतिका कुबल (जिल्हा परिषद शाळा, जकातवाडी – आंबोली), पौर्णिमा हळदणकर ( कामगार कल्याण केंद्र, सावंतवाडी), रवींद्र गवस (सेवानिवृत्त केंद्रप्रमुख) यांचाही विशेष सन्मान होणार आहे. तरी कार्यक्रमाला उपस्थित राहून सदर पुरस्कार स्वीकारावेत, असे आवाहन दीपक केसरकर मित्र मंडळाने केले आहे.

You cannot copy content of this page