सांगुळवाडी कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून सुरू आहे प्रचार, प्रसिध्दी
वैभववाडी प्रतिनिधी
सध्याच्या काळात आधुनिक पध्दतीने शेती करणे गरजेचे आहे. आधुनिक शेतीमुळे शेतकऱ्यांची मेहनत कमी होऊन उत्पादन वाढ होत आहे. त्यामुळेच डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीने शेतीसाठी लागणाऱ्या पिकांचे सुधारित जाती,शेती अवजारे व प्राण्यांच्या जाती विकसित केलेले आहेत.
ही माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचे काम कृषी महाविद्यालय सागुळवाडी येथील चौथ्या वर्षातील विद्यार्थ्यांनी नावळे गावात कृषी माहिती केंद्र बनवण्यात आले होते. या माहिती केंद्रामध्ये कृषी दुतानी कृषी विद्यापीठ दापोलीनी विकसित केलेल्या भाताच्या फळांच्या सुधारित जातींची व कृषी अवजारे व प्राण्यांच्या जातींची पोस्टर लावून शेतकऱ्यांना ही माहिती दिली यावेळी माजी पोलीस पाटील विलासराव राणे मंगेश राशिवडे, सौनिलम रावराणे, गुणवंत राणे, भाईराव रावराणे, मारुती नराम, कृषी सहाय्यक दीपक मसेकर, ग्रामसेवक अनिल घुगे, गणपत सुतार माजी उपसरपंच गीतांजली राणे, सुरेश खोपडे, आदी शेतकरी व कृषी दूत ऋषिकेश घाणेरकर, संदेश तेली, वैभव साठे, वैभव दाईघोडे, शुभम वारंग, वैभव भारुडकर, धीरज कोळेकर,प्रथमेश लांबे, आधी उपस्थित होते या कृषी देताना मार्गदर्शन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी बी पाटील, प्राध्यापक विवेक कदम, प्राध्यापक प्रियांका राठोड, आदींनी केले.
फोटो नावळे शेतकऱ्यांना शेती विषयी माहिती देताना कृषी दुत
