भरत गोगावले यांचे ते वक्तव्य न्यायालयाचा अवमान करणारे

खा विनायक राऊत;कोलगाव येथील बी एस एन एल टॉवरचे केले उद्घाटन

⚡सावंतवाडी ता.२९-: आमदार भरत गोगवलेचे ते वक्तव्य न्यायालयाचा अवमान करणारे असून, सत्तेचा दुरुपयोग करण्यात येत असून, त्यांचे न्यायाल्याबाबतचे वक्तव्य न्यायालयाचा निदर्शनास आणून देणार असून, त्यांच्यावर कारवाईची मागणी करणारा असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते आज कोलगाव येथील बीएसएनएल टॉवरचा उद्घाटन करण्यात आले होते यावेळी खासदार विनायक पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, शिवसेनेला गुंटाळून टाकण्यासाठी बंडखोर ४० आमदार आणि १२ खासदार काम करत असून, कपटी वृत्तीने हे बोलत जरी असले तरी यांचा बोलवता धनी वेगळाच आहे. ते भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या प्रादेशिक पक्ष संपुष्टात आणण्याच्या वक्तव्यावरून दिसून येत आहे. असा आरोप त्यानी यावेळी केला.

यावेळी शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर आम्हीच घेऊ, त्यासाठी महानगरपालिकेत आम्ही सर्वात प्रथम अर्ज केला असून, महानगरपालिकेने कोणत्याही प्रकारचे नाटक केले तर आम्ही न्यायालयात जाऊ असा इशारा देखील दिला.

You cannot copy content of this page