काँग्रेसतर्फे घरगुती गणेश आरास सजावट स्पर्धेचे आयोजन

⚡मालवण ता.२९-: सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय कॉंग्रेस – पुरस्कृत आणि प्रत्येक तालुकानिहाय काँग्रेस कमिटी तर्फे गणेश चतुर्थीनिमित्त घरगुती गणपती आरास सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्या-त्या तालुक्यातील अध्यक्ष, सर्व पदाधिकारी यांच्या समन्वयातून दि. २ ते १२ सप्टेंबर दरम्यान ही स्पर्धा घेण्यात येणार आहे.

या स्पर्धेसाठी आपल्या गणेश मूर्ती विसर्जनाच्या एक दिवस अगोदरपर्यंत आपला व्हीडिओ पाठविणे अनिवार्य आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी आपल्या घरातील गणपतीच्या जवळ केलेल्या सजावटीचा, चलचित्राचा एक मिनिटाचा व्हीडिओ बनवून व्हॉटस्अॅपद्वारे पाठविणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील विजेत्यांना बक्षिसांचे वितरण सिंधुदुर्गचे संपर्कमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाला रु.११, १११. द्वितीय रु. ७,७७७, तृतीय रु. ५,५५५, उत्तेजनार्थ एकूण दोन पारितोषिके प्रत्येकी १००० रुपये व प्रमाणपत्र प्रत्येक तालुक्यातील विजेत्यांना दिली जाणार आहेत.

तालुकानिहाय समन्वयक-विधाता सावंत, प्रकाश डिचोलकर – दोन्ही वेंगुर्ले. मेघनाद धुरी, अरविंद मोंडकर – मालवण. अभय शिरसाट, विजय प्रभू कुडाळ. प्रदीप मांजरेकर, प्रवीण वरुणकर- कणकवली. वसंत नाटेकर, मीनाताई बोडके-वैभववाडी, रवींद्र म्हापसेकर, समीर वंजारी, रुपेश आईर-सावंतवाडी. वासुदेव नाईक, सुभाष दळवी. उल्हास मणचेकर, उमेश कुलकर्णी-देवगड. अधिक माहितीसाठी संपर्क-जिल्हा स्पर्धा मुख्य समन्वयक अरविंद मोंडकर (९८९२०५५८२०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page