कणकवलीत शिवसेनेच्या नगरसेविका माही परुळेकर शिंदे गटात दाखल

संजय आग्रे यांच्या उपस्थितीत केला प्रवेश;सर्व निवडणुका लढणार

⚡कणकवली ता.२९-: कणकवली नगर पंचायतीच्या शिवसेनेच्या नगरसेविका माही परुळेकर या शिंदे गटात दाखल झाल्या आहेत. माजी जि.प. सदस्य संजय आग्रे यांच्या उपस्थितीत त्यांनी व कणकवली शहरातील प्रिया टेंबकर यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी शिंदे शिवसेना गटात प्रवेश केला आहे.यावेळी आगामी काळात जिल्हा पदाधिकारी व सर्व तालुकाप्रमुख नेमणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेश चतुर्थी नंतर करणार आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुका शिवसेना म्हणून आम्ही लढणार असल्याची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य संजय आग्रे,माजी जि. प.सभापती संदेश पटेल यांनी दिली.

कणकवली येथील शिंदे गट शिवसेना संपर्क कार्यालय येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी भास्कर राणे, सुनील पारकर, बाळू पारकर, संजय पारकर, माजी नगरसेवक भूषण परुळेकर, दामू सावंत (जाणवली), सुनील हरमलकर (शिवडाव), चिन्मय राणे, शेखर राणे, अमित सावंत (तरंदळे), राजन म्हाडगुत (कणकवली), दिलीप घाडीगावकर, अतुल दळवी, प्रमोद सांगवेकर, विजय खरात, राजू कासले, मारुती सावंत, बाबू आचरेकर, निलेश तेली, अनिल खोचरे, अनिल सावंत आदी शिवसैनिक उपस्थित होते.

संदेश पटेल म्हणाले,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जनतेचे सरकार आहे,लोककल्याणकारी कामे करण्यासाठी हे कार्यालय काम करणार आहे. सीएम कार्यालय आहे,त्याचे प्रतिनिधी इथे असतील.आमच्याकडे मोठा नेता कोणीही नाही,आम्ही कार्यकर्ते आहोत. आता कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.
आमच्या सरकाराला चांगला प्रतिसाद आहे.चतुर्थी नंतर जिल्ह्यात पदाधिकारी निवड केली जाणार आहे.भाजपा व आमची युती आहे.आगामी काळात युती करुनच निवडणुका लढवल्या जातील. आम्ही जिल्हा परिषद,पंचायत समिती व ग्रामंपचायत निवडणुकीत आम्ही उतरणार आहोत.

कणकवली शहर व परिरातील प्रिया टेबकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत अनेक महिलांनी प्रवेश केला.त्यामध्ये दर्शना घाडीगावकर, सुवर्णा गुरव, सारिका गुरव, प्रमिला चव्हाण, तुलसी पालकर, सुधा कुडतरकर, हिराबाई धनवटे, रेखा धनवटे, ज्योती धनवटे, रितू शिरसाट, अनिता कुडतरकर, आनंदी कोरगावकर, अनुष्का पवार आदी महिलांचा समावेश आहे.यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

You cannot copy content of this page