तर नागरिकांच्या हस्ते उद्घाटन;राष्ट्रवादी शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर यांचा इशारा
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदच्या माध्यमातून आमदार दीपक केसरकर यांच्या स्थानिक विकास निधीतून बसविण्यात आलेले हायमास्ट टॉवर काम पूर्ण होऊन ३ महिने उलटल्यानंतर देखील बंद अवस्थेत आहेत. झिरंग, सबनिसवाडा, सालईवाडा आदी भागातील हे हायमास्ट उद्घाटनच्या प्रतिक्षेत आहेत. त्यात गणेशोत्सव २ दिवसांवर आला आहे, अशावेळी जर हायमास्ट काम पूर्ण होऊन बंद असतील तर त्याचा फायदा काय ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष देवेंद्र टेंमकर यांनी करत दोन दिवसांत हायमास्ट कार्यान्वीत झाले नाही तर गणेश चतुर्थी दिवशी नागरिकांच्या हस्ते या हायमास्टच उद्घाटन करत सुरू करणार असल्याचा इशारा श्री. टेमकर यांनी दिला आहे.
