खास.विनायक राऊत;कनेडी येथे शिवसेना विभागीय शाखेचे उद्घाटन
⚡कणकवली ता.२९-: केंद्रातील भाजपच्या नेत्यांनी आर्थिक प्रलोभने दाखवून शिवसेना संपवण्याचा विडा उचलला अशा या सत्तेसाठी लाचार झालेल्यांना धडा शिकूया. ग्रामीण भागातील शिवसेना मजबूत होती, ती मजबूतच राहील असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी कनेडी येथे बोलताना व्यक्त केला.
शिवसेनेच्या नाटळ सांगवे हरकुळ बुद्रुक विभागीय कार्यालयाचे उद्घाटन खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार वैभव नाईक, शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळा गावडे, जिल्हा महिला प्रमुख नीलम पालव, युवासेने उपतालुकाप्रमुख उत्तम लोके, तालुकाप्रमुख डॉ. प्रथमेश सावंत, बाळा भिसे, विभाग प्रमुख आनंद आचरेकर, भिरवंडे सरपंच सुजाता सावंत, गांधीनगर सरपंच मंगेश बोभाटे, भिरवंडे सेवा सोसायटीचे चेअरमन बेनी डिसोजा, व्हाईस चेअरमन शेखर सावंत, बंडू ठाकूर, मंगशे सावंत, अंजली सापळे आदी मान्यवर उपस्थितीत होते.
खास. राऊत म्हणाले, सह्याद्री पट्ट्यातील मावळा हा नेहमीच शिवसेनेसोबत राहिला आहे. कोकणातील हा मावळा शिवसेनेमुळे वेगवेगळ्या पदावर पोचला. मात्र, काही लोकांनी गद्दारी केली. शिवसेनेमध्ये गद्दारी करणाऱ्यांना त्यांची जागा शिवसेनेच्या लोकांनी दाखवलेली आहे. आताही तीच परिस्थिती राहील. शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर लोकांचा विश्वास आहे. त्यामुळेच या भागातील अनेक प्रश्न आम्ही गेल्या पाच वर्षात सोडवू शकलो. नरडवे प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. कुंभवडे धरणाची कामही पुढच्या वर्षी पूर्ण होईल. त्यामुळे या भागात सिंचन क्षेत्र वाढवून हा भाग सुजलाम सुफलाम होईल. या भागामध्ये चुकीच्या पद्धतीने विकास कामे सुरू आहेत. कामे आम्ही करायचे आणि श्रेय त्यांनी लुटायचे अशी स्थिती आहे. नाटक मल्हार पुलासाठी आम्ही तातडीने निधी मिळवून दिला. म्हणून यंदा हा पूल वाहतुकीसाठी सुरू झाला. अशी अनेक विकास कामे शिवसेनेच्या माध्यमातून या भागांमध्ये झालेली आहे. मात्र, विकास कामे नकरात केवळे सरकारी पैसा ठेकेदारीने लुटायचा. त्यांना आम्ही वेळोवेळ त्यांची जागा दाखवून दिली आहे. हा भाग १९९० पूर्वी ही शिवसेनेचा बालेकिल्ला होता. आजही तो बालेकिल्ला अभेद आहे. हे आजच्या उपस्थितीवरून मला दिसून आले.
आम. वैभव नाईक म्हणाले, या भागामध्ये शिवसेनेची सत्ता कायम होती. याही पुढे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ग्रामपंचायतची सत्ता शिवसेना मिळवले यात शंका नाही. या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास शिवसेनेच्या माध्यमातून यापूर्वी झालेला आहे. असाच तो चालू राहणार आहे. इथला शिवसेनेचा कार्यकर्ता नेहमीच पक्षाच्या बाजूने राहिला आहे. तो कुठल्याही दबावाला बळी पडलेला नाही. गौरीशंकर खोत म्हणाले, या भागांमध्ये शिवसेना वाढवण्यासाठी आम्ही १९९० पूर्वी प्रयत्न केला. जुने शिवसैनिक आजही आमच्या सोबत आहेत. ते कायम राहतील. पक्षाच्या माध्यमातून येथील अनेक विकास कामे झाली आहेत. पण, काही लोक अंगावर येण्याचा प्रयत्न करतात त्यांना शिंगावर घेण्याची ताकद आमच्या मध्ये आहे. सतीश सावंत यांनी या भागातील बेनामी ठेकेदारी मोडीत काढायची आहे. कानेडी पंचक्रोशी साठी पहिले शिवसेना विभागीय कार्यालय आम्ही सुरू केले. त्यासाठी इथल्या मंडळींनी जागा दिली. मात्र, ही जागा भाजपच्या काही लोकांनी बळकवून घेतली. ती जागा लवकरच आम्ही ताब्यात घेऊ असा विश्वास व्यक्त केला.
संदेश पारकर यांनी शिवसेनेच्या वाटचालीबाबत माहिती देऊन राज्यात यापुढे शिवसेनेची सत्ता असेल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी संजय पडते यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. परिसरातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत श्री. राऊत यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी मान्यवरांचे स्वागत तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत यांनी केले. सूत्रसंचालन आनंद आचरेकर यांनी केले. विभागीय कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी सत्यनारायण पूजेचे ही आयोजन करण्यात आले होते. सकाळपासून कनेडी परिसरामध्ये शिवसेनेच्या कार्यकत्यानी हजेरी लागली होती. परिसर भगवामय करून सोडला होता. ढोल ताशाच्या गजरात खासदार श्री. राऊत आणि आमदार वैभव नाईक यांचे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले.
