महामार्गाच्या अडचणी न सोडविता लोकशाही मार्गाने होणारी आंदोलने दाबण्याचा प्रयत्न

परशुराम उपरकर यांचा बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांना टोला: निदान रस्त्यावरील खड्डे बुजवा

⚡कणकवली ता.२९-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राज्य व इतर मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे चाकरमानी व श्रीगणेशाचा यंदाचा प्रवासी खड्ड्यातूनच होत आहे. महामार्गाच्या अडचणी न सोडविता लोकशाही मार्गाने होणारी आंदोलने दाबण्याचा प्रयत्न राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून
होत असेल तर ते चुकीचे आहे. येथे विरोधीपक्ष केवळ दिखावूपणाचाच प्रयत्न करत असल्याची टीका मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली.राज्याच्या सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी महामार्गाची पाहणी करण्याच्या निमित्ताने वार्षीक कार्यक्रम पूर्ण केला मात्र हायवे हा विषय त्याच्या खात्याकडे येतच नाही, त्यामुळे हायवे बाबत त्यांनी कितपत निर्णय घ्यावा याचा विचार करण्याची गरज आहे असे उपरकर म्हणाले

मनसेच्या कणकवली येथील
संपर्क कार्यालयात पत्रकारांशी बोलताना परशुराम उपरकर म्हणाले, यापूर्वी मंत्र्यांनी अशाप्रकारे दौर केलेले होते पण प्रत्येक चतुर्थी सणापुर्वी दौरे होत असले तरीही जनतेची खड्ड्यांपासून मुक्तता होते का? चाकरमानी, सर्वसामान्य नागरीकांना यातून प्रवास करावा लागतो. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी हायवेचा दौरा केला. मुळात हा हायवेचा विषय त्यांच्या खात्याकडे येतच नाही. मात्र, जिल्हयातील इतर मार्गावर पडलेल्या खड्ड्यांबाबत त्यांनी पाहणीही केलेली नाही. वास्तविक हे पाहण्याची गरज होती. मात्र, ज्या ठेकेदारांच्या कामांमुळे खड्डे पडतात तेच सर्व ठेकेदार सोबत दौऱ्यात होते. दुसरीकडे खड्याबाबत कितीही सांगितले गेले तरीही खड्डे भरण्यासाठी पैसेच आलेले नाहीत, त्यामुळे अधिकारी जांभ्या दगडाने खड्डे भरतात व दुसऱ्या दिवशी पावसात वाहून जातात. जनतेला कायमस्वरूपी खड्डेमुक्त रस्ते मिळण्याची गरज असल्याचे श्री. उपरकर म्हणले

जनतेची खड्डे मुक्त रस्त्यांची मागणी कोणत्याही सरकारने पुर्ण केलेली नाही मंत्री जिल्हा दौरा संपवून गेले, त्यावेळी त्यांनी गोव्यात दौरा करण्याची गरज होती. तिथेही रस्त्यांची कामे होतात. सरकारही त्याच पक्षाचे आहे. मात्र, रस्ते गुळगुळीत आहेत त्याबाबत विचार करण्याची गरज आहे. महामार्गाच्या अडचणीबाबत लोक त्रस्त आहेत. मात्र, असे असताना मंत्र्यांनी त्यांना धमकी देणे उचित नाही. लोकशाही मार्गाने होणारी आंदोलने दाबणे चुकीचे आहे. मंत्री घोषणा करतात पण पुढे काय होते ते जनतेने पाहिले आहे. मात्र जिल्हयात विरोधी पक्ष शिल्लक राहिलेला नाही. विधानभवनात पायऱ्यावर मंत्र्यांविरोधात आंदोलने करणारे येथे आल्यावर त्याच मंत्र्यांना बुके देत अभिनंदन करत आहेत. विरोधी पक्षाचे काम हे केवळ दिखावूपणा आहे. या सर्व बाबींचा विचार करता राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच सरकार बनण्याची गरज असून जनतेने त्यांना सहकार्य करावे तेच जनतेला न्याय देतील, असेही परशुराम उपरकर म्हणाले.

You cannot copy content of this page