मठ येथे युवतीचा खून? तीन संशयित ताब्यात…

वेंगुर्ले पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांची माहिती

⚡वेंगुर्ला ता.२९-: वेंगुर्ला तालुक्यातील मठ येथील एका २२ वर्षीय युवतीचा मृतदेह जवळच असलेल्या बागेमध्ये आढळुन आला आहे. दरम्यान या युवतीचा गळा दाबून खून करण्यात आल्याचा संशय वेंगुर्ले पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाची नोंद वेंगुर्ले पोलीस ठाण्यात झाली असून पोलिसांनी तीन संशयीतांना ताब्यात घेतले आहे.
कुडाळ येथे कामानिमित्त जाणारी सदर युवती दोन दिवसांपासून बेपत्ता होती. तिचा मृतदेह रविवारी रात्री ११ वाजता येथील काजूच्या बागेत वेतोरेतील एका युवकाला हा मृतदेह निदर्शनास आला. त्यांनतर रात्री तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल होत हा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात आणण्या आला आहे. याप्रकरणी वेंगुर्ले पोलीस अधिक शोध घेत आहेत.

You cannot copy content of this page