सावंतवाडीतील जलतरण तलाव तात्काळ सुरू करा…

सुरेश भोगटे; अन्यथा आंदोलन उभारणार…

⚡सावंतवाडी ता.२९-: सावंतवाडी येथील जलतरण तलाव तात्काळ सुरू करण्यात यावा अशी मागणी माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी नगरपालिकेचे प्रशासक आणि मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी त्यांनी हा तलाव बंद का ठेवण्यात आला आहे. याचे कारण लेखी द्यावे अशी विनंती केली आहे. यावेळी एका महिन्यात हा जलतरण तलाव नागरिकांसाठी सुरू न केल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

You cannot copy content of this page