सावंतवाडी तहसिलदार श्री. पाटील यांनी केले मार्गदर्शन
⚡आंबोली ता.२८- : आंबोली ग्रामपंचायत येथे आज किसान सन्मान योजना, मतदार क्रमांकाशी आधार कार्ड जोडणी, ई-पिक नोंदनी या बाबत उपस्थितांना सावंतवाडी तहसिलदार श्री.पाटील यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी ग्रा.पं.सदस्य महेश पावसकर,सारीका गावडे, काशीराम राऊत, तंटामुक्ती अध्यक्ष उल्हास गावडे, सर्कल गुरव साहेब, तलाटी धाडीगावकर, ग्रामविकास अधिकारी बहिरम ,कर्मचारी व ग्रामस्त उपस्थित होते. आंबोली सरपंच सौ.सावित्री पालेकर यांनी मानले तहसिलदार श्री. पाटील यांचे आभार मानले.
