उंबर्डे भुईबावडा रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीस सुरळीत करा…

काँग्रेसची तहसीलदार यांच्याकडे मागणी

वैभववाडी संजय शेळके
    गणेशउत्सवापूर्वी उंबर्डे भुईबावडा राज्यमार्गावरील खड्डे बुजवून मार्ग वाहातूकीस सुरळीत करावा. अशी मागणी राष्ट्रीय काॕग्रेसच्यावतीने निवेदनाद्वारे तहसिलदार रामदास झळके यांच्याकडे केली आहे.
    उंबर्डे ते भुईबावडा रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघात घडत आहेत. या खड्यातून वाहन चालक व प्रवाशांना जीव मूठीत धरुन प्रवास करावा लागत आहे. उंबर्डे वाणीवाडी ते भुईबावडा दरम्यान खड्डे बुजविण्यासाठी जांभा दगड व रॕबीट महिनाभरापूर्वी रस्त्याकडेला टाकले आहेत. माञ अदयाप खड्डे भरण्यात आलेले नाहीत. कोकणातील महत्वाचा सण गणेशउत्सव काही दिवसावर येऊन ठेपला आहे. तत्पूर्वी पडलेले खड्डे बुजविण्यात यावेत. 
    तसेच कुसूर नापणे रस्त्याचीही तीच अवस्था आहे.  वैभववाडी रेल्वेस्टेशकडे जाणारा हा महत्वाचा रस्ता आहे. या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावेत. त्याचप्रमाणे मांगवली शेवरी फाटा रस्ता खड्डे व वाढलेल्या झाडीमुळे धोकादायक बनला आहे. या रस्त्यावरील खड्डे बुजवून झाडी तोडण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी तालुकाध्यक्ष दादामियाॕ पाटणकर, महिला अध्यक्षा मिनाताई बोडके, वसंत नाटेकर, आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page