सांगेली येथील शिवसेना कार्यकर्त्यांनी केले श्रमदानं
⚡सावंतवाडी ता.२७सहदेव राऊळ-: जायपिवाडी ते सांगेली ग्रामपंचायत कार्यालय रस्ता सांगेली येथील शिवसैनिकांनी श्रमदानातून खड्डेमुक्त केला.
गणेश चतुर्थी सण अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. जायपिवाडी ते सांगेली ग्रामपंचायत कार्यालय या रस्त्यावर सगळीकडे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. त्यामुळे या खड्ड्यांचा गणेश भक्तांना, वाहनधारकांना, पादचाऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून सांगेली येथील शिवसैनिकांनी श्रमदान करून, जायपिवाडी ते ग्रामपंचायत कार्यालय सांगेली हा भरवस्तीचा रस्ता खड्डेमुक्त केला.
या श्रमदानात शिवसेना विभागीय प्रमुख पुरुषोत्तम राऊळ, सांगेली उपसरपंच रमाकांत राऊळ, ग्रामपंचायत सदस्य दीपक सांगेलकर, शाखा प्रमुख आनंद सावंत, अशोक राऊळ, प्रकाश सनाम, प्रवीण गावडे, बबन सांगेलकर, दीपक कदम, सुरेश सांगेलकर, संतोष राऊळ, भिकाजी राऊळ आदी सर्व कार्यकर्ते सहभागी झाले होते. यामुळे सगळीकडून समाधान व्यक्त होत आहे.
