*तर युवा सेना उपतालुका प्रमुखपदी रोहन रावराणे
⚡वैभववाडी ता.२६ संजय शेळके-: वैभववाडी तालुका उप तालुका प्रमुख पदी महेश रावराणे तर युवा सेना उप तालुका प्रमुख पदी रोहन रावराणे यांची निवड कुडाळ मालवण चे शिवसेना आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, युवा नेते संदेश पारकर, शिवसेना नेते अतुल रावराणे, जिल्हा महिला आघाडी प्रमुख निलम सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.
त्यांची ही निवड शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत, संपर्क प्रमुख अरूणभाई दुधवडकर, आमदार वैभव नाईक, जिल्हा प्रमुख संजय पडते यांच्या सूचनेनुसार लोरे विभागीय मेळाव्यात शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते युवासेना जिल्हा प्रमुख तथा जिल्हा बँक संचालक श्री.सुशांत नाईक यांनी नियुक्ती पत्र देऊन जाहीर केली
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, तालुकाप्रमुख मंगेश लोके, महिला आघाडी तालुका प्रमुख नलिनी पाटील, माजी जि. प. सदस्या दिव्या पाचकूडे, लोरे विभागप्रमुख तथा लोरे सरपंच विलास नावळे, अनिल नराम, उपविभागप्रमुख सूर्यकांत परब, मागासवर्गीय सेल तालुकाप्रमूख विनोद पेडणेकर, माजी सभापती लक्ष्मण रावराणे, युवासेना जिल्हा सरचिटणीस स्वप्नील धुरी, माजी सरपंच नाना रावराणे, दिलीप मांजलकर लोरे विभागातील शिवसेना पदाधिकारी व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
