करूळ घाट रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाकडे अधिकाऱ्यांचा दुर्लक्ष

वैभववाडी भाजप तालुकाध्यक्ष नासीर काझी यांचा आरोप

⚡वैभववाडी ता.२६ संजय शेळके-: करूळ घाट रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या दुरावस्थेला संबंधित अधिकारीच जबाबदार आहेत. अधिकारी स्वतः च्या नातेवाईकांकडून ही कामे करून घेत आहेत. निकृष्ट दर्जाच्या कामांकडे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. असा आरोप वैभववाडी भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी प्रसिद्धी पत्रकातून केला आहे.

परजिल्ह्यातील ठेकेदारांसाठी करुळ घाट कुरण बनला आहे. अतिवृष्टीत कोसळलेली संरक्षक भिंतीचे करण्यात आलेले बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे झाले आहे. सदर काम अधिका-यांनी नातेवाईकाला मॅनेज करुन दिले आहे. असा आरोप काझी यांनी केला आहे. सदर निकृष्ट कामाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी ही नासीर काझी यांनी केली आहे. ठेकेदार व अधिकारी यांची या कामात मिलीभगत आहे. या बांधकामाकडे अधिकाऱ्यांनी पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. असा आरोपही काझी यांनी केला आहे.

करूळ घाटातील संरक्षक भिंत ८ आॅगष्ट रोजी कोसळली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार या मार्गावरुन वाहनांना ये -जा करण्यास परवानगी देण्यात आली. संबंधित विभागाने या संरक्षक भिंतीचे काम परजिल्ह्यातील नातेवाईक ठेकेदाराला दिले. त्या ठेकेदाराला या घाटाचे कोणतेही सोयरसुतक नाही. त्या ठेकेदाराने कामासाठी लागणारी वाळू व इतर साहित्य हे निकृष्ट दर्जाचे वापरले आहे. काम सुरू असताना या कामाबाबत वाहन चालक व प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. अशा प्रकारे निकृष्ट दर्जाचे काम करुन प्रवाशांच्या जिवीताशी कोण खेळत असेल तर खपवून घेतले जाणार नाही. करुळ घाट मार्ग दुरावस्थेबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री यांचे लक्ष वेधणार असल्याचे काझी यांनी पत्रकात म्हटले आहे.

You cannot copy content of this page