मालवण- कसाल व मालवण -आंगणेवाडी रस्त्याची कामे लवकरात लवकर पूर्ण करावी

निलेश राणे यांची सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे मागणी

⚡मालवण ता.२६-: मालवण- कसाल रस्ता तसेच मालवण- आंगणेवाडी रस्ता या दोन्ही रस्त्यांची दुरावस्था झाली असून या रस्त्यांच्या कामासाठी निधी उपलब्ध करून लवकरात लवकर रस्ता कामे पूर्ण करावे अशी मागणी भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन सादर करून केली.

मालवण शहर हे पर्यटन शहर असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी येत असतात. तसेच कोकणातील मोठी जत्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडीच्या श्री देवी भराडी मातेच्या जत्रेला लाखो भाविक येत असतात. यांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून लवकरात लवकर हा रस्ता करण्यात यावा, अशी मागणी यावेळी निलेश राणे यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली. याबाबत बोलताना ना. रवींद्र चव्हाण यांनी मालवण- आंगणेवाडी रस्ता कामाची निविदा काढली असून हे काम लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करणार असे सांगितले. तसेच मालवण- कसाल रस्ता कामाची निविदा लवकरात लवकर काढण्यासाठी प्रयत्न करून प्रथम प्राधान्याने हा रस्ता करण्याचे ना. चव्हाण यांनी सूचित केले. यावेळी निलेश राणे यांच्या समवेत भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, मालवण शहर प्रभारी विजय केनवडेकर, माजी नगरसेवक गणेश आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page