⚡मालवण ता.२६-: शेअर मार्केटबाबत सर्वसामान्यांमध्ये भीती आहे. सखोल अभ्यासाच्या आधारेच शेअर मार्केटमध्ये यशस्वी होता येते. कोट्याधीश बनविण्याची क्षमता ‘ट्रेडिंग’मध्ये आहे. केवळ तीन टक्केच लोक शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात. त्यामुळे प्रत्येक घरात ‘ट्रेडर’ निर्माण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. स्मार्टफोन्सच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनण्याची ताकद शेअर मार्केटमध्ये आहे, असे प्रतिपादन वेल्थजेनिक्स संस्थेचे संचालक सचिन बुक्कम (गोवा) यांनी केले.
मालवण येथील हॉटेल महाराजा येथे गुरुवारी शेअर मार्केटवर मोफत सेमिनार पार पडले. या सेमिनारला चांगला प्रतिसाद लाभला. बुक्कम यांनी भारतीय शेअर मार्केट व फॉरेक्स शेअर मार्केटवर विस्तृत विवेचन केले.
यावेळी बुक्कम यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेअर मार्केट करणाऱ्या ट्रेडरांची संख्या वाढण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात ठिकाणी मागणीनुसार मोफत सेमिनार घेतले जातील. ट्रेडिंगमधून प्रत्येक व्यक्ती आर्थिकदृष्ट्या सक्षम बनावा, हेच वेल्थ जेनिक्सचे स्वप्न असल्याचे सांगितले
यावेळी साळेल येथील ट्रेडर संदेश आचरेकर याने आपले मनोगत व्यक्त केले.
