वागदेतील अपघातात मृताच्या नातेवाईकांना दहा लाखांची आर्थिक मदत

माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत यांनी काढला तोडगा

कणकवली ता.२६-:* कणकवली नजिक वागदे येथे महामार्गावर झालेल्या अपघातानंतर तब्बल तीन तासाहून अधिक काळ रुग्णवाहिकेतून नेत असलेला प्रशांत प्रभाकर सावंत (नरडवे गडगेवाडी, 47) यांचा मृतदेह नागरिकांनी रोखून धरल्यानंतर अखेर याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे यांच्याशी माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांची चर्चा झाल्यानंतर संबंधित मृत्युमुखी पडलेल्या प्रशांत यांच्या कुटुंबीयांना ठेकेदार कंपनीकडून पाच लाख व आमदार नितेश राणे यांच्याकडून पाच लाख अशी दहा लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची ग्वाही देण्यात आली. व त्यानंतर हा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय येथे पाठविण्यात आला.

आमदार नितेश राणे यांनी यासंदर्भात ठेकेदार दिलीप बिल्डकॉनच्या व्यवस्थापनाशी चर्चा करत तातडीने हा निर्णय घेतला. त्यानंतर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत व अन्य पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांची कार्यालयात भेट घेत त्यांना बंद असलेल्या वागदे मधील रस्त्याबाबत मार्ग काढण्याची मागणी केली. त्यावर तातडीने सदर अपूर्ण असलेल्या वागदे तील रस्त्याच्या जागेवर असलेली खडी हटवून रस्ता वाहतुकीस सुरू ठेवावा अशा सूचना प्रांताधिकाऱ्यांनी दिली. शाखा अभियंता साळुंखे यांना सूचना देण्यात आल्या. तसेच जमीन मालक यांचा जो मोबदला द्यायचा बाकी आहे तो देण्याबाबत लेखी आश्वासन देण्यात आले. आज पासून वीस दिवसात मोबदला न दिल्यास जमीन मालक पुन्हा आंदोलन करतील असा इशारा गोट्या सावंत यांनी दिला. जमीन मालकांनी तसे पत्र देखील प्रांताधिकाऱ्यांना दिले.

You cannot copy content of this page