श्री देवी माऊली युवक कला, क्रिडा, सेवा मंडळाच्यावतीने आयोजन
⚡सावंतवाडी ता.२६सहदेव राऊळ-: न्हावेली-चौकेकरवाडी येथील श्री देवी माऊली युवक कला, क्रिडा,सेवा मंडळाच्यावतीने गणेश चतुर्थी कालावधीत न्हावेली गाव मर्यादित पर्यावरणपूरक गणेश सजावट स्पर्धा-२०२२ चे आयोजन केले आहे. स्पर्धेचे हे यंदाचे पहिलेच वर्ष आहे .
या स्पर्धेत प्रथम क्रमांक १५००/- रुपये, द्वितीय क्रमांक १०००/- रुपये, तृतीय क्रमांक : ७००/ रुपये अशी बक्षीसे ठेवण्यात आली आहेत.
या स्पर्धेत गणेशाची मुर्ती फक्त मातीची असलेल्यांनाच या स्पर्धेत सहभाग घेता येणार आहे. गणपतीची आरास पूर्णतः पर्यावरणपूरक असावी, माटवीच्या सजावटीसाठी लागणारे साहित्य पूर्णतः पर्यावरणपूरक असावे, हालता किंवा स्थिर देखावा पर्यावरण पूरक असावा, सजावटीसाठी धर्माकोलचा वापर केल्यास या स्पर्धेसाठी अपात्र राहिल, गणपती सजावटीचा फक्त एक फोटो, किती दिवस आपला गणपती असणार आहे, हि माहिती पाठवावी. या स्पर्धेच्या परिक्षणाचे सर्व अधिकार मंडळाकडे राहतील, असे स्पर्धेचे नियम आहेत. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.
प्रवेशाची अंतिम तारीख शुक्रवार ०२ सप्टेंबरपर्यंत सायंकाळी ४ वाजे पर्यत असणार आहे
९४२०८६४९२९ या व्हाट्सअप नंबर आपले नाव, वाडी, मोबाईल नंबर पाठवायचे आहेत. अधिक माहितीसाठी ९४२११९०६७८, ८३२९५७२७९४, ९४२११४५१६१ या नंबरवर संपर्क करावा, असे आवाहन श्री देवी माऊली युवक कला, क्रिडा,सेवा मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
