शिवसेना नाटळ – हरकुळ विभागीय कार्यालयाचे 29 ऑगस्ट रोजी उद्घाटन

⚡कणकवली ता.२६-: कणकवली तालुक्यातील सांगवे कनेडी बाजारपेठ येथील शिवसेना नाटळ – हरकुळ विभागीय कार्यालयाचा उद्घाटन सोहळा सोमवार 29 ऑगस्ट, 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता संपन्न होणार आहे.

यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार राजन साळवी, शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, भैरी भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल रावराणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. उद्घाटन सोहळ्यानिमित्त सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या उद्घाटन सोहळ्यास विभागातील सर्व पदाधिकारी, शिवसेनिक, ग्रामस्थ यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, उपतालुकाप्रमुख हेमंत सावंत, विभाग प्रमुख आनंद आचरेकर, विभाग प्रमुख सूर्याजी रासम यांनी केले आहे.

You cannot copy content of this page