५१ रक्तदात्यांनी केले रक्तदान…
मालवण दि प्रतिनिधी
ग्लोबल रक्तदाते मालवण, कोळंब पंचक्रोशी मालवण, राष्ट्रीय संस्कार संवर्धन मंडळ सिंधुदुर्ग कोळंब शाखा आणि ग्लोबल रक्तवीरांगणा मालवण यांच्या वतीने हॉटेल मालवणी, कोळंब येथे गुरुवारी आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ५१ रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले.
गावागावातून रक्तदान जनजागृती करूया, चला रक्तदान करूया. असे सांगत रक्त पेढीतील रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी तातडीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या रक्तदान शिबीर मध्ये अति दुर्मिळ बॉम्बे ब्लडग्रुप टेस्ट ही करण्यात आली.
रक्तदान शिबिर आयोजनात सौ. नेहा कोळंबकर, अमेय देसाई, राजू बिडये, अंकुश कातवणकर, प्रियाल लोके, सौ. प्रतिमा भोजणे, सौ. सिया धुरी, सौ. राधा केरकर, सौ. माधुरी नेमळेकर, दिपक ढोलम, चेतन भोजणे, गणेश आचरेकर, संदीप शेलटकर, दाजी कोळंबकर, जनजागृती संस्था अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर, यांसह अन्य सहकरी व आयोजक संस्था सदस्य, यांनी शिबीर आयोजनात महत्वाची भूमिका बजावली. लायन्स क्लब यांचेही सहकार्य लाभले.
यावेळी अनिल निव्हेकर, कोळंब सरपंच प्रतिमा भोजणे, अवि नेरकर, समीरा बांदेकर, दीपक ढोलम, विजय ढोलम, राजा शंकरदास, सिया धुरी, वैशाली शंकरदास, प्रियाल लोके, निखिल नेमळेकर, माधुरी नेमळेकर, अपूर्वा लोके, राजू हडकर, राधा केरकर, संदीप शेलटकर, दाजी कोळंबकर, पुरुषोत्तम भोजणे,अंकुश कातवणकर, राजू बिडये, संदीप पेडणेकर यांसह अन्य मान्यवर व सहकारी उपस्थित होते. वैद्यकीय अधिकारी विष्णू खरात, रक्तपेढी तंत्रज्ञ प्रशांत सातार्डेकर, सौ. बागेवाडी, राहुल जाधव, अनिल खाडे यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. सर्व रक्तदाते, कोळंब ग्रामस्थ व उपस्थितांचे आयोजकांच्या वतीने आभार मानण्यात आले.
