दागिने, भांडी पॉलिश च्या नावाखाली वेंगुर्ले मध्ये एका महिलेची फसवणूक

⚡वेंगुर्ले ता.२५-: वेंगुर्ले तालुक्यात घरोघरी फिरून सोन्याचे दागिने, तांब्याची व पितीळीची भांडी चकाचक करून देण्यासाठी भैय्या पावडरची विक्री करता करता घरोघरी फिरत आहेत. येथील एका महिलेचे दागिने पॉलिश करण्यासाठी घेऊन तिची फसवणूक करण्यात आली आहे.

गावात फिरणारे हे परोरांतिय असून दागिने, भांडी पॉलिश करण्याच्या नावाखाली ते फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. काल एका महिलेची फसवणूक करण्यात आली आहे. वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा ते मोचेमाड टांक चे दरम्यान बुधवारी दुपारी 12 ते 2 च्या दरम्याने हा 30 ते 35 वर्षीय बिहारी तरुण एका महिलेची फसवणूक करून पसार झाला आहे. त्या महिलेचा नवरा घरी आल्यानंतर त्याने हा सारा प्रकार ऐकून सोनाराकडे दागिन्यांची खात्री केली असता आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. तरी नागरिकांनी अशा फसवणुकी पासून सावध रहा असे आवाहन त्या महिलेने केले आहे.

You cannot copy content of this page