Headlines

उद्यापासून जिल्हाधिकारी प्रवेशद्वारावर बेमुदत घंटानाद आंदोलन

जिल्हाध्यक्ष रावजी यादव यांनी दिला इशारा

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२७-:* २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्थापित बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या माध्यमातून एक दिवस उपोषण करण्यात आले. उपोषणाला उच्च तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत, माजी आमदार प्रमोद जठार, राजन तेली यांनी भेट दिली. परंतू समाधानकारक न्याय मिळाला नाही यासाठी म्हणून उद्या २८ जानेवारीपासून जिल्हाधिकारी यांच्या प्रवेशद्वारावर वाद्यांच्या गजरात स्पीकर लावून आळीपाळीने बेमुदत घंटानाद आंदोलनाचा इशारा जिल्हाध्यक्ष रावजी यादव यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page