*💫सावंतवाडी दि.२८-:* कार्यकर्ता हा कणा मानून नेहमी तळागाळातील कार्यकर्त्यांच्या हाकेला धाऊन जाण्याची कुवत ठेवणारा नेता म्हणून माजी खासदार डॉ. निलेश राणे यांची कोकणच्या राजकारणात ओळख आहे . राजकारणात वारसा असला किंवा कोणी गॉडफादर असला म्हणून बऱ्याच जणांना संधी मिळते पण त्या मिळालेल्या विरासतीबरोबरच स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्याची गरज असते आणि अशी स्वतंत्र ओळख निर्माण करणारा नेताच राजकारणात कितीही वादळे आली तरी टिकून राहतो . अशातीलच एक व्यक्तिमत्व म्हणजे माजी खासदार डॉ. निलेश राणे ! राजकारणात कार्यकर्त्यांशी मैत्रीचे संबंध जोपासणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना पाहिले जाते .राजकारणापलीकडेही दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून डॉ. निलेश राणे यांची एक वेगळी ओळखआहे . त्यामुळे अल्पावधीतच डॉ. निलेश राणे यांनी राजकिय वर्तुळात प्रगतीची शिखरे पादाक्रांत केली आहेत .आताचा रत्नागिरी आणि पुर्वीच्या राजापूर लोकसभा मतदार संघाला मधू दंडवते , बॅ. नाथ पै यांचा वारसा आहे . सन 2009 च्या लोकसभा निवडणुकीत खासदार सुरेश प्रभू यांचा पराभव करून ते खासदार झाले. कोकणचा आतापर्यंतचा युवा खासदार म्हणून देशभरात त्यांना ओळखले जाऊ लागले . या काळात देशा च्या संसदेसारख्या सर्वोच्च सभागृहात त्यांनी आपल्या अभ्यासू वृत्तीने विविध विकासात्मक बाबी मांडून सिंधुदुर्ग चा आणि पर्यायाने कोकणचा ठसा उमटविला. माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या पावलावर पाऊल ठेऊन ते आज आपले राजकीय कार्य करीत आहेत. कोकणी माणसाचा विकास झाला पाहिजे , प्रत्येकाचे दरडोई उत्पन्न वाढले पाहिजे हीच भावना त्यांनी सदोदित ठेवली आहे. कोंकणावर कोणतीही नैसर्गिक आपत्ती येऊ दे डॉ. निलेश राणे नेहमीच मदतीसाठी सर्वात आधी पुढे असतात . फयान वादळ असो अथवा महापूर डॉ. राणे यांनी संकटांच्या काळात केलेली मदत नक्कीच विसरण्याजोगी नाही . आपल्या खासदारकीच्या काळात त्यांनी जिल्ह्याच्या आणि आपल्या मतदार संघाच्या विकासासाठी अनेक विकासकामे केली . त्यातीलच एक काम झाराप ते पत्रादेवी बायपासचे म्हणावे लागेल. रेल्वे विभागाकडून कामे करून घेण्यासाठी प्रसंगी त्यांनी आंदोलनही केले .आणि त्या आंदोलनाच्या जोरावर ठरवलेले विकासाचे इप्सित साध्यही केले. राज्याच्या राजकारणात महत्वाकांक्षी आणि आक्रमक नेता म्हणून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना ओळखले जाते .त्यांची तीच आक्रमकता डॉ. निलेश राणे यांनी आत्मसात केली आहे.विरोधकांवर त्यांनी केलेला प्रहार नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांची निवड भाजपचे प्रदेश सचिव म्हणून करण्यात आली आहे.
दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस – माजी खासदार डॉ. निलेश राणे
