वेदिका देसाई हीचा बांदा मराठा समाजाकडून सत्कार…

अमेरिकेतील विद्यापीठात निवड झाल्याने करण्यात आला सत्कार..

बांदा/प्रतिनिधी
कळणे (ता. दोडामार्ग) येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील युवती वेदिका संतोष देसाई हिची अमेरिका न्यूजर्सी मध्ये एनजेआयटी विद्यापीठात मास्टर इन इंडस्ट्रीयल इंजिनिअरिंग अभ्यासक्रमासाठी निवड झाल्याने बांदा मराठा समाजाच्या वतीने तिच्या निवासस्थानी जाऊन सत्कार करण्यात आला.
वेदिका ३० रोजी शिक्षणासाठी अमेरिका येथे रवाना होणार आहे. यावेळी तिचे शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन व पेढा भरवून अभिनंदन करण्यात आले. यावेळी मराठा समाज अध्यक्ष राजाराम उर्फ बाळू सावंत, तंटामुक्ती अध्यक्ष गुरुनाथ सावंत, माजी सरपंच दीपक सावंत, बांदा विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर सावंत, माजी अध्यक्ष तथा पत्रकार निलेश मोरजकर, निलेश कदम, वेदिकाची आई सौ. गायत्री देसाई आदी उपस्थित होते.
यावेळी वेदिका हिला पुढील उच्च शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच उच्च शिक्षणासाठी परदेशी विद्यापीठात निवड होणे हि मराठा समाजासाठी गौरवस्पद बाब असल्याचे अध्यक्ष बाळू सावंत यांनी सांगितले.

You cannot copy content of this page