सिंधुदुर्गनगरी ता २४
महाराष्ट्र आशा, गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी
आज सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत आंदोलन केले.
सिंधुदूर्ग जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तक महिलांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा. जोपर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळत नाही तोपर्यंत दरमहा २५ हजार रुपये वेतन द्यावे,
दिवाळीपूर्वी सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांना भाऊबीज म्हणून ३ हजार रुपये मिळाले पाहिजे, ज्या कामाचा मोबदला दिला जात नाही त्या कामाची सक्ती करु नये, सक्ती करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी,आदि मागण्या आंदोलनाच्या माद्यमातुन संघटनेंने केल्या आहेत.याबाबत चे निवेदन
सिंधुदुर्ग परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांना शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आले.
यावेळी संघटनेच्या वतीने अध्यक्ष शंकर पुजारे यांनी
ज्या कामाचा मोबदला आशाना दिला जात नाही त्या कामाची सक्ती आशांच्यावर केली जाते ती थांबवावी अशी मागणी केली असता ,याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी ज्या प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये असा प्रकार घडत असेल त्यांनी तातडीने जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क करावा, आपल्या समस्या सोडवण्यात येतील.
असे आश्वासन दिले.असल्याचे शंकर पुजारे यांनी सांगितले.
या आंदोलनात ज्येष्ठ कामगार नेते कॉ शंकर पुजारी, शारदा खानोलकर, अनुष्का गुराम,प्रतिभा ठुंबरे अनुष्का गुराम, वैशाली परब, जोती फाले, पूजा परब, यांच्यासह जिल्ह्यातील आशा कर्मचारी सहभागी झाल्या होत्या.
